Shraddha Kapoor

ड्रग्ज प्रकरणी दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचं नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर शनिवारी ( २६ सप्टेंबर) ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती.

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत