दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
Dear Dr. Manmohan Singh Ji,
Wishing you a speedy recovery.
India needs your guidance and advice in this difficult time.— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 19, 2021
दरम्यान, कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही केली आहे.




