PM Modi cancels visit to Bengal on Friday, will hold high-level meet

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींचा बंगाल दौरा रद्द, कोरोना परिस्थितीबद्दल घेणार उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उद्याचा बंगालमधील प्रचार दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की मी उद्या पश्चिम बंगालचा प्रचार दौरा रद्द केला असून त्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकआहे. Tomorrow, will be chairing high-level meetings to review […]

अधिक वाचा
manmohan singh

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करोना पॉझिटिव्ह; एम्स रूग्णालयात दाखल…

दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. Dear Dr. Manmohan Singh Ji, Wishing you a speedy recovery. India needs your guidance and advice in this difficult time. — Rahul Gandhi […]

अधिक वाचा
maharashtra records highest number of daily cases of corona

चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्येत होतेय विक्रमी वाढ, आज राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित

राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. […]

अधिक वाचा
home minister Anil Deshmukh

ब्रेकिंग : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी […]

अधिक वाचा
New guidelines announced by Union Home Ministry

केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केल्या नव्या गाईडलाइन्स, सक्तीने नियमांची अंमलबजावणी

गेल्या काही दिवसांत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केलं आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. हे नियम १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. गृहमंत्रालयाने सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने नियमांची […]

अधिक वाचा
Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine

मोठी बातमी : अदर पूनावाला यांनी जाहीर केली करोना लसीची किंमत आणि उपलब्धता

अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती दिली आहे. सध्या करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र […]

अधिक वाचा
Donald Trump's

करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ..

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. ट्रम्प यांनीच आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प हेलिकॉप्टरमधून वॉल्टर रिड लष्कर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. याआधी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला. […]

अधिक वाचा