New guidelines announced by Union Home Ministry

केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केल्या नव्या गाईडलाइन्स, सक्तीने नियमांची अंमलबजावणी

कोरोना

गेल्या काही दिवसांत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केलं आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. हे नियम १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गृहमंत्रालयाने सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. तसंच गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन, पोलिसांवर नियमांची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांनी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची सक्ती केली जावी. याशिवाय ज्या शहरांमध्ये आठवड्यातील पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्या वर आहे तिथे कार्यालयीन वेळांबद्दल तसंच इतर उपाययोजनांबद्दल विचार करावा जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल असंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. गृहमंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेत कोरोनाला रोखण्यासाटी स्थानिक स्तरावर नाईट कर्फ्यूसारखे निर्बंध लावू शकतात असं स्पष्ट केलं. तसंच केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाउन लावला जाऊ नये असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत