Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine

मोठी बातमी : अदर पूनावाला यांनी जाहीर केली करोना लसीची किंमत आणि उपलब्धता

देश

अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती दिली आहे. सध्या करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र सरकार प्रत्येक डोससाठी २५० रुपये खर्च करत ९० टक्के पुरवठा खरेदी करणार आहे अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.

“भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटींचं टार्गेट ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.

सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल असंही अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे. मार्चच्या आधी मार्केटमध्ये १० टक्के डोस उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत लस वितरण सरकारच्या अखत्यारित राहील असं त्यांनी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत