The Indian economy is recovering - International Monetary Fund

कोरोनाच्या काळात झालेल्या हानीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

देश

कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यातून भारतीय अर्थव्यवस्था आता सावरत आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (International Monetary Fund) गुरुवारी सांगितलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा झाल्याचं दिसून आलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपभोक्त्यांच्या वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला अजून गती येण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 23.9 टक्क्यांनी घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य प्रवक्ता गॅरी राईस यांनी सांगितलं की, भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संक्रमणाची मोठी झळ सहन करावी लागली होती. आता त्यातून सावरत ती हळू हळू मार्गावर येताना दिसत आहे.

कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने केलेल्या उपाययोजनेच्या संबंधित प्रश्नांना उत्तर देताना गॅरी राईस म्हणाले की, राजकोषीय, मौद्रिक आणि आर्थिक क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे उद्योग, कृषी आणि दुर्बल घटकांना सहाय्य मिळालं आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन ती सावरताना दिसतेय. आम्हाला आशा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी भारत सरकारकडून सध्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची व्याप्ती वाढवण्यात येईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत