नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये लसीच्या ग्रीन पासबाबत सध्या वाद सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी युरोपमधील 8 देशांनी कोविशील्डला ग्रीन पास देऊन मान्यताप्राप्त लसींच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. याचा अर्थ या देशांमध्ये कोविशील्डचे दोन्ही डोस घेत असलेल्या भारतीयांना कोरोना नियमांमधून सूट देण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, मान्यता देणार्या देशांमध्ये जर्मनी, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, […]
टॅग: covishield
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिलंच नव्हतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १३ मे रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित करण्यात आलं होतं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या […]
ब्रेकिंग : केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीचे कमाल दर केले निश्चित
नवी दिल्ली : केंद्राने आज खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसीचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत कोविशील्डची किंमत ७८० रुपये, कोवॅक्सीनची किंमत 1410 रुपये आणि रशियन लस स्पुटनिक व्ही लसीची किंमत 1145 रुपये इतकी आहे. निर्धारित दरासाठी दररोज किंमतींवर नियंत्रण ठेवले जाईल आणि परीक्षण केले जाईल. अधिक शुल्क आकारल्यास कोणत्याही खासगी लसीकरण केंद्रावर कठोर कारवाई […]
कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेल्या अपॉईंटमेंटचं काय होणार? सरकारने केलं स्पष्ट..
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेली वेळ म्हणजेच अपॉईंटमेंट वैध असेल आणि को-विन पोर्टलवर ती रद्द केला जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले आहे की को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, परिणामी लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही. 13 मे रोजी […]
कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले
नवी दिल्ली : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागाराने कोविड विरोधी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12-16 आठवड्यांपर्यंत करण्याची शिफारस केली होती, जी स्वीकारण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “कोविशील्ड लसच्या दोन डोसमधील अंतर […]
बिग ब्रेकिंग : केंद्राकडून महत्वाच्या सूचना, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवा
नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप आणि लस […]
ब्रेकिंग : कोरोना लसीची भारतीय बाजारात खुली विक्री सुरू होणार.. जाणून घ्या…
नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत ५२ लाख ९० हजार ४७४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरणाची १ लाख ४ हजार ७८१ सत्र पार पडली आणि ३ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. लवकरच कोरोना लसीची भारतीय बाजारात खुली विक्री देखील सुरू होणार आहे. कोरोना […]
‘या’ समस्या असतील तर कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेऊ नका, सीरम आणि भारत बायोटेकने दिली माहिती
कोविशील्ड लस (Covishield vaccine) आणि कोवॅक्सिन (Covaxin) यांनी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये कोणत्या लोकांना ही लस घेऊ नये, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला तसेच तीव्र ताप, रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींना फॅक्टशीटमध्ये ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. तर कोविशील्डची निर्मिती करणार्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या फॅक्टशीटमध्ये अशा […]
मोठी बातमी : ‘कोविशील्ड’ कोरोना लशीला आज भारतात मान्यता मिळण्याची शक्यता
भारतात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. आज ‘कोविशील्ड‘ या लशीला भारतात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची (SEC) आज (बुधवार) कोरोना लसीवर बैठक होणार असून त्यामध्ये भारतामध्ये कोरोना लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीला मान्यता मिळाली आहे. तिच्याशी संबंधित कोविशील्ड […]
पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]









