Big news: Covishield corona vaccine is likely to be approved in India today

मोठी बातमी : ‘कोविशील्ड’ कोरोना लशीला आज भारतात मान्यता मिळण्याची शक्यता

देश

भारतात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. आज ‘कोविशील्ड‘ या लशीला भारतात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची (SEC) आज (बुधवार) कोरोना लसीवर बैठक होणार असून त्यामध्ये भारतामध्ये कोरोना लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीला मान्यता मिळाली आहे. तिच्याशी संबंधित कोविशील्ड लशीला भारतात वापरास मान्यता देण्याची प्रतिक्षा आहे, त्यावर आज बैठक होणार आहे. भारतात ही बैठक महत्त्वपूर्ण आहे, कारण बुधवारी ब्रिटनने ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीच्या वापरास मान्यता दिली आहे. काही दिवसांत ब्रिटनमधील लोकांना ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लशीचा डोस मिळण्यास प्रारंभ होईल.

सिरम इन्स्टिट्यूट भारतात ऑक्सफोर्ड- अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोरोना लस बनवित आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, भारतात कोविशील्डचे सुरुवातीचे 4-5 कोटी डोस साठवले गेले आहेत.

भारत सरकारच्या वतीने लस देण्याची तयारी आधीच सुरू आहे. सुरुवातीला प्रामुख्याने ही लस 30 कोटी लोकांपर्यंत पोहचविण्यावर भर आहे, ज्यामध्ये कोरोना वॉरियर्सला प्राधान्य दिले जाईल. आरोग्य कर्मचारी, पोलिस, कोरोना वॉरियर्स, 50 वर्षांच्या पुढील लोक आणि आजारी लोक यांना प्राधान्य दिले जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत