Warning of heat wave to some districts of the state, appeal to the citizens to take care
देश

पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने सर्वांना हैराण केले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेसे पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आणि उपकरणांची पुरेशी उपलब्धता व सज्जता ठेवण्यास सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि गंभीर स्थिती असलेल्या भागांत गारवा देणारी उपकरणे सतत कार्यरत राहतील, याची खात्री करण्याची सूचना केली आहे. सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये १ मार्चपासून एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमाच्या (आयडीएसपी) अंतर्गत उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन देखरेख सुरू करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

राज्यांच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही या पत्रात नमूद आहे. आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुइड्स, बर्फाची पाकिटे, ओआरएस आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आरोग्य सुविधेच्या सज्जतेचा आढावा घेतला पाहिजे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

बाहेरील उच्च तापमान आणि घरातील तापमानाच्या वारंवार होणाऱ्या फरकामुळे उष्णतेचा परिणाम जाणवू शकतो. यामुळे उष्णतेशी संबंधित आजार होऊ शकतात, असे पत्रात म्हटले आहे. उष्म्यामुळे पुरळ येणे, हात, पाय आणि पायाच्या घोट्याला सूज येणे तसेच जळजळ होणे, स्नायूंमध्ये उसण भरणे, उष्माघात, चक्कर येणे या तक्रारी उद्भवू शकतात.

हे करा

  • अधिकाधिक पाणी प्यावे
  • आपले शरीर शक्यतो संपूर्ण झाकून घ्यावे
  • शक्य तितके घरात राहावे
  • कामगारांना कामाच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी दिले जावे
  • कामगारांनी थेट सूर्यप्रकाश जाताना सावधगिरी बाळगावी
  • कामगारांसाठी कामाची जागा सावलीत उपलब्ध करून द्यावी

हे टाळा

  • नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये, विशेषत: दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे
  • चहा, कॉफी किंवा मोठ्या प्रमाणात मद्यपान टाळा किंवा साखर मिसळलेले पेय टाळा
  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न, तसेच शिळे अन्न टाळा
  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत