नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने सर्वांना हैराण केले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले. […]

