International flights now banned till January 31, the central government took an urgent decision

केंद्र सरकारने घेतला तातडीचा निर्णय, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी

देश

केंद्र सरकारने तातडीचा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे, असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत