राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? असा प्रश्न त्यांनी केलेल्या ट्विट नंतर उपस्थित झाला आहे. एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार, असं सांगितलं होतं. पण आता आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण कोरोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र त्यांना १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आपण ईडी कार्यालयात १४ दिवसांनी हजर राहू, असं खडसेंनी म्हटलं आहे.
आज ई. डी. कार्यालयात जाणार होतो, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवसानंतर जाणार आहे.@NCPspeaks pic.twitter.com/wJJOVmjAJH
— Eknath Khadse (@EknathGKhadse) December 30, 2020
नोव्हेंबर महिन्यात एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांनी ट्विट करुन कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.