ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंताजनक परिस्थिती ओढवलेली असली तरी आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड – एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्नानंतर आणखी एक लस उपलब्ध झाली आहे.
लवकरच देशभरात या लशीचा वापर सुरु केला जाणार आहे. ब्रिटनमधील समाजकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने MHRA विभागाची शिफारस मान्य करत लशीला मान्यता दिली. अनेक चाचण्या आणि तज्ज्ञांमध्ये झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. ही लस सर्व निकषांमध्ये उत्तीर्ण झाल्याचे समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.