Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems

‘या’ समस्या असतील तर कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेऊ नका, सीरम आणि भारत बायोटेकने दिली माहिती

कोरोना देश

कोविशील्ड लस (Covishield vaccine) आणि कोवॅक्सिन (Covaxin) यांनी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये कोणत्या लोकांना ही लस घेऊ नये, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला तसेच तीव्र ताप, रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींना फॅक्टशीटमध्ये ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. तर कोविशील्डची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या फॅक्टशीटमध्ये अशा व्यक्तींना लस न घेण्याचा सल्ला दिला आहे, ज्यांना लसीच्या कोणत्याही घटकापासून गंभीर ऍलर्जीची समस्या आहे.

कोवॅक्सिन लस कोणी घेऊ नये :

  1. ज्या व्यक्ती रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारी औषधे घेतात
  2. ज्यांना ऍलर्जीचा इतिहास आहे
  3. ताप आहे
  4. रक्तस्त्राव डिसऑर्डर असेल किंवा रक्त पातळ आहे, अशा लोकांनी कोवॅक्सिन लस घेऊ नये.
  5. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनाही कोवॅक्सिन लस घेऊ नये, कारण त्यांच्यावर लसीचा अभ्यास केलेला नाही.
  6. याशिवाय कोरोना विषाणूची दुसरी लस घेतलेल्या लोकांनीही कोवॅक्सिन घेऊ नये. लस घेण्यापूर्वी हेल्थकेअरने नमूद केलेल्या इतर गंभीर आरोग्य समस्यांविषयी जाणून घ्या.

कोविशील्ड कोणी घेऊ नये :

  1. ज्या लोकांना कोविशील्डच्या कोणत्याही घटकापासून गंभीर ऍलर्जीची समस्या आहे, त्यांनी ही लस घेऊ नये. या लसीमध्ये एल-हिस्टिडाइन, एल-हिस्टिडाइन हायड्रोक्लोराइड मोनोहायड्रेट, डिसोडियम एसीटेट डायहाइड्रेट (EDTA) आणि इंजेक्शनसाठी पाणी हे घटक आहेत.
  2. कोविशील्डचा प्रथम डोस घेतल्यानंतर ऍलर्जीची समस्या आल्यास दुसरा डोस घेणे टाळा.

दोन्ही औषध कंपन्यांच्या फॅक्टशीटमध्ये म्हटले आहे की आरोग्याशी संबंधित सर्व माहिती जसे की वैद्यकीय स्थिती, ऍलर्जीची समस्या, ताप, इम्युनो-कॉम्प्रोमाइज्ड किंवा इतर कोणतीही लस घेतलेली असेल तर या सर्व गोष्टी सांगा.

सीरम संस्था आणि भारत बायोटेक या दोघांनीही त्यांच्या कोरोना विषाणूच्या लसीचा धोका आणि दुष्परिणाम नोंदवले आहेत. यात इंजेक्शनच्या ठिकाणी सूज, वेदना, लालसरपणा आणि खाज सुटणे या लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय लस घेतलेला हात अकडने, वेदना, डोकेदुखी, ताप, अस्वस्थता, थकवा, पुरळ, मळमळ आणि उलट्या असे काही सामान्य दुष्परिणाम जाणवू शकतात.

भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये म्हटले आहे कि, क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोवॅक्सिनने चार आठवड्यांनंतर दिल्या गेलेल्या दुसर्‍या डोसने संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण केली आहे. तथापि, कोवॅक्सिनची क्लिनिकल कार्यक्षमता अद्याप जारी केली गेली नाही, कारण त्यावरील तिसऱ्या फेजचा अभ्यास अद्याप चालू आहे.

सीरम संस्थेने आपल्या फॅक्टशीटमध्ये म्हटले आहे कि, ४ ते 12 आठवड्यांच्या दरम्यान देण्यात आलेल्या लसीच्या दोन डोसमुळे कोरोनापासून संरक्षण मिळू शकते. ही लस किती काळ संरक्षण देईल याबद्दल माहिती नाही, परंतु कोविशील्डच्या दुसर्‍या डोसनंतर संरक्षणात्मक इम्यूनोलॉजिकल रिस्पॉन्स 4 आठवड्यांपर्यंत मिळू शकतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत