Prime Minister Narendra Modi took the second dose of corona vaccine

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

कोरोना देश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली. ते म्हणाले कि, “आज मी एम्समध्ये कोविड १९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उपायांपैकी एक उपाय लसीकरणाचा आहे. तुम्ही लस घेण्यायोग्य असाल तर लवकर लस घ्यावी.” पंतप्रधानांनी को-विन वेबसाईटची लिंकही (CoWin.gov.in) ट्विटमध्ये जोडली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत