मुंबई : कंगना रनौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असते. कंगना नेहमीच बॉलिवूडमधील मूव्ही माफिया आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवताना दिसते. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये कंगनानं अक्षय कुमारकडून तिला सीक्रेट कॉल आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक मोठ्या स्टार्सनी गुपचूप कॉल करून कौतुक केल्याचं कंगनाचं म्हणणं आहे.
कंगनानं अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करत तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं कि, ‘बॉलिवूडमध्ये शत्रू एवढे आहेत की, काही लोकांना मात्र बिनधास्तपणे कौतुक करणंही कठीण जात आहे. मला अनेक सीक्रेट कॉल्स आणि मेसेज येतात. ज्यात अक्षय कुमारसारख्या मोठ्या स्टार्सचासुद्धा समावेश आहे. ज्यांनी ‘थलायवी’च्या ट्रेलरनंतर माझं खूप कौतुक केलं पण ते दीपिका आणि आलियाच्या चित्रपटांप्रमाणे माझं बेधडकपणे कौतुक करू शकत नाही. कारण बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियाची दहशत आहे.’
लेखक अनिरुद्ध गुहा यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत म्हटलं कि, ‘बॉलिवूडमध्ये स्वतःचं मत मांडणं तुम्हाला संकटात टाकू शकतं’ यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘कंगना याला अपवाद आहे आणि ती या पिढीतली अशी एकमेव अभिनेत्री आहे.’ अनिरुद्ध यांच्या याच ट्वीटवर रिप्लाय करत कंगनानं हा खुलासा केला.
Wish an industry of art can be objective when it comes to art, and not indulge in power play and politics when it comes to cinema, my political views and spirituality should not make me a target of bullying, harassment and isolation but if they do, then obviously I will win …❤️
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 7, 2021