उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीने सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ‘७ वर्षांची मुलगी ४ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. शनिवारी तिचा मृतदेह सापडला. तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला रविवारी अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. ४ नोव्हेंबरला मुलगी एकटी असल्याचे दिसले. तिला उचलून जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली आहे. हा आरोपी एका मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती.