home minister Anil Deshmukh
कोरोना महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, ”आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.”

गेल्या नऊ महिन्यात पोलीस खात्यातील भरपूर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.  त्या काळात राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख स्वत: विविध ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धीर देत होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत