बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व माहिती घेण्यासाठी तिथे २८ सप्टेंबर रोजी सगळ्यात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र, पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास मजबूर केलं,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.
“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळं अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील,” असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
2. इसके बाद वहाँ मीडिया के जाने पर भी उनके साथ हुई बदसलूकी तथा कल व परसों विपक्षी नेताओं व लोगों के साथ पुलिस का हुआ लाठीचार्ज आदि अति-निन्दनीय व शर्मनाक। सरकार को अपने इस अहंकारी व तानाशाही वाले रवैये को बदलने की सलाह, वरना इससे लोकतन्त्र की जड़े कमजोर होंगी। 2/2
— Mayawati (@Mayawati) October 5, 2020
हाथरस प्रकरणाचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे प्रयत्न होत असताना सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे. राजकीय नेत्यांवर लाठीमार करून त्यांना रोखण्याचे प्रकार घडले. माध्यमांना देखील येथे भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.




