Girl gang-raped at picnic spot
क्राईम देश

तरुणीवर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रियकराला बेदम मारहाण

कर्नाटक : म्हैसूरजवळ एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी तिच्या प्रियकरासोबत म्हैसूर पासून 13 किमी अंतरावर असलेल्या चामुंडी हिल्स येथे फिरायला गेली होती. येथे ६ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली असून 24 तास उलटूनही आरोपींना अटक करता आलेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुणी आणि तिचा प्रियकर हे दोघे चामुंडी हिल्स या पिकनिक स्पॉटवर फिरायला गेले होते. यावेळी ६ जणांनी त्यांना घेरले आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करू लागले. परंतु, पैसे मिळाले नाहीत म्हणून या नराधमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच तरुणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, पीडित तरुणीचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. तरुणी आणि तिच्या प्रियकराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

व्यापाऱ्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

शेफने सूप बनवण्यासाठी कापला कोब्रा सापाचा फणा, २० मिनिटांनी कापलेल्या फ़ण्याने केला शेफला दंश…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत