young man stabbed his wife

अवैध संबंधाच्या संशयातून पत्नीवर भररस्त्यात चाकूनं ४५ पेक्षाही जास्त वार, व्हिडीओ होतोय व्हायरल

क्राईम देश

नवी दिल्ली : दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी व्यक्तीनं अवैध संबंधाच्या संशयातून भररस्त्यात आपल्या पत्नीला अडवून चाकूने सपासप वार केले आहेत. यावेळी रस्त्यावर अनेकजण होते, पण आरोपीचा राग पाहता मृत महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढं सरसावलं नाही. दरम्यान आरोपीने पतिने आपल्या पत्नीची 45 पेक्षा अधिक वेळा वार करून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

26 वर्षीय नीलूचं आठ महिन्यांपूर्वी 40 वर्षीय हरिश मेहतासोबत लग्न झालं होतं. आरोपी हरिश हा मुळचा गुजरातमधील अलकापूरी येथील रहिवासी असून तो दिल्लीत एका मॅरेज ब्युरोमध्ये काम करतो. तर नीलू एका दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयात काम करत होती. पत्नी नीलूने रुग्णालयात काम करणं पती हरिशला आवडत नव्हतं, त्यामुळे आरोपीने तिला काम करण्यास मनाई केली. पण नीलूने रुग्णालयात काम करणं सुरूचं ठेवलं. आपल्या पत्नीचे बाहेर अवैध संबंध असल्याचा संशय आरोपी पतीला आला. यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे नीलू पतीला सोडून आपल्या आईवडिलांसोबत दिल्लीतील बुद्ध विहार येथे राहू लागली. त्यामुळे आरोपी हरिशने तिच्या हत्येचा कट रचला.

दरम्यान, काल (10 एप्रिल) दुपारी 2 च्या सुमारास नीलू कामावरून घरी जात असताना आरोपीने तिचा रस्ता अडवला आणि सोबत आणलेल्या चाकूने भररस्त्यात तिच्यावर हल्ला केला. यावेळी पीडित महिला जीवाच्या अकांताने स्वतः चा बचाव करत होती. मात्र आरोपीनं तिच्यावर निर्दयीपणे अनेक वार केले. यावेळी रस्त्यावर अनेकजण उपस्थित होते परंतु, महिलेची मदत करण्याची कुणाचीही हिम्मत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीचा पाठलाग करून अटक केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत