चंदीगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी डोस घेतला होता. तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे.
भारत बायोटेकने याबाबत ट्वीट करत माहिती दिली की, कोवॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी 28 दिवसांचा कालावधी आहे. लसीचा परिणाम दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी निश्चित होणार आहे. कोवॅक्सिन लस दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 50 टक्के स्वयंसेवकांना कोवॅक्सिन लस तर इतरांना प्लेसबो (डमी लस) देण्यात आला होता.
चाचणीमध्ये निम्म्या स्वयंसेवकांना लस आणि निम्म्या स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला. मात्र स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली जात नाही. तसेच लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असते. त्यानंतर शरीरात अँटिबॉडीज् तयार होत असतात.
The phase 3 trial is a double-blind study where volunteers have a 50% chance of receiving either vaccine or placebo.#BharatBiotech #COVAXIN #clinicaltrials #COVID19
— BharatBiotech (@BharatBiotech) December 5, 2020