मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधन झाल्यामुळे भारत सरकारने 11 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी कळविले आहे.
संबंधित घडामोडी
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या ४८ तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने येत्या ४-५ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
पुणे : मसाज-स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका
पुणे : पुण्यातील विमाननगर या मध्यवर्ती परीसरात मसाज सेंटरच्या नावाखाली परराज्यातील मुलींकडून वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन आरोपींचा शोध सुरु आहे, तर 3 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर […]
सोलापूर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट
सोलापूर : सोलापूर येथील श्री मार्कंडेय रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. मिळालेल्या माहितीनुसार, श्री मार्कंडेय हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजनचा प्लांट […]