Drug trafficking gang busted in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त

पुणे : पुणे शहरामध्ये मेफेड्रॉन (MD) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेकडुन करण्यात आला आहे. आरोपींना जेरबंद करून एकुण 3,63,900/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते, यावेळी दोन व्यक्ती लुल्लानगर येथील कलश प्युअर
व्हेज हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी संशयितरीत्या वावरताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी सदर संशयित व्यक्तींना ताब्यात घेत तपास केला असता त्यांच्याकडे अंमली पदार्थ आढळले.

आरोपी मतीन हुसेन मेमन (वय 21 वर्षे, रा. सातवा मजला, आदिया हाईट्स, सबेरा पार्क, स.नं.42 कोंढवा, पुणे) याच्याकडे 1,52,100/- रू किंमतीचा 10 ग्रॅम 140 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ आढळला आणि शाहरुख कादीर खान (वय 29 वर्षे, रा. फ्लॅट नं. 302, सी-विंग, युनिटी पार्क, कोंढवा, पुणे) याच्याकडे 1,51,800/- रू किंमतीचा 10 ग्रॅम 120 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ व 10 हजार रुपयांचा एक मोबाईल फोन, ५० हजार रुपयांची एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण 3,63,900/- रु किंमतीचा ऐवज बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळाला. पोलिसांनी हा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त केला आहे.

तसेच सदरचा अंमली पदार्थ त्यांनी अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय-33 वर्षे, रा. विंग ए-406, साई व्दाराकायम सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे याच्याकडुन विक्रीकरीता आणला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यालाही ताब्यात घेवुन या तिघांविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-1, गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-1, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती शैलजा जानकर, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके,
योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, यांनी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत