cruise drugs case : Govt orders action against ex-NCB officer Sameer Wankhede
महाराष्ट्र मुंबई

समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप आहे. ‘अमन’ नावाच्या एका ट्विटर हँडलवरून 14 ऑगस्ट रोजी समीर वानखेडे यांना मेसेज मिळाला. यात त्या व्यक्तीने लिहिले, “तुमको पता है तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा (तुम्ही काय केले हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल).” तर दुसर्‍या मेसेजमध्ये “तुमको खतम कर देंगे” असे म्हटले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआर नोंदविला आहे. काल वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला. दरम्यान, पोलीस सूत्रांनी सांगितले की या अकाऊंटचे फॉलोअर्स शून्य होते आणि वानखेडे यांना धमक्या देण्याच्या उद्देशाने ते तयार करण्यात आल्याचा संशय आहे.

मुंबई क्रूझवर छापा
एनसीबीच्या मुंबई कार्यालयाचे माजी झोनल डायरेक्टर वानखेडे हे अंमली पदार्थ विरोधी एजन्सीने मुंबई क्रूझवर ऑक्टोबर 2021 मध्ये हाय-प्रोफाइल छापे टाकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते, त्यानंतर एजन्सीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अन्य 19 जणांना अटक केली होती. आणि काही अंमली पदार्थही जप्त केल्याचा दावा केला. तथापि, नंतर एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिली होती.

नवाब मालिकांनी केले अनेक आरोप
वानखेडे हे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करत असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर जात प्रमाणपत्र खोटे असल्याच्या आरोपांसह अनेक आरोप केले होते. वानखेडे भाजपसाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर वानखेडे यांची एनसीबीमध्ये नियुक्ती
जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, IRS अधिकारी वानखेडे यांची एनसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती, जेव्हा संभाव्य ड्रग्ज अँगलच्या तपासादरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आली होती. त्यांच्या कार्यकाळात दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग यांसारख्या अनेक हायप्रोफाईल सेलिब्रिटींची बॉलीवूडमधील ड्रग्सच्या संबंधाच्या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत