the new strain of corona found in Maharashtra being more dangerous

चीनने जाणीवपूर्वक कोरोनाव्हायरस जगभरात पसरवला, चीनच्या संशोधकाचा धक्कादायक खुलासा

कोरोना ग्लोबल

चीन : चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या एका संशोधकाने दावा केला आहे की चीनने जाणीवपूर्वक कोरोनाव्हायरस जगभरात पसरवला आहे. कोविड-19 हे जैविक शस्त्र म्हणून वापरले गेले. जेणेकरून लोकांना संसर्ग व्हावा. चीनकडून जगाविरुद्ध चालवल्या जात असलेल्या जैविक दहशतवादाचा हा भाग होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संशोधक चाओ शाओ यांनी सांगितले की, त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोना विषाणूचे चार स्ट्रेन देण्यात आले होते. त्यांना कोणता स्ट्रेन अधिक वेगाने पसरतो हे शोधून काढण्यास सांगण्यात आले. चाओ शाओ यांनी हा धक्कादायक खुलासा इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्या जेनिफर झेंग यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. जेनिफर ही चीनमध्ये जन्मलेली एक मानवाधिकार कार्यकर्ता आणि लेखिका आहे. चाओ शाओ यांनी मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या वरिष्ठाने त्यांच्या सहकारी संशोधकाला कोरोनाव्हायरसचे चार प्रकार दिले. या चारपैकी कोणत्या स्ट्रेनमध्ये पसरण्याची क्षमता जास्त आहे याची चाचणी करण्यास सांगितले. कोणता स्ट्रेन जास्तीत जास्त प्रजातींना संक्रमित करू शकतो. ते माणसांना किती आजारी बनवू शकते हे देखील शोधण्यास सांगितले. चाओ शाओ म्हणाले की, चीनने कोरोना विषाणूचा जैविक शस्त्र म्हणून वापर केला आहे.

व्हायरस पसरवण्यासाठी पाठवले गेले
चाओ यांनी सांगितले की, त्यांचे अनेक साथीदार 2019 पासून बेपत्ता आहेत. त्यावेळी वुहानमध्ये मिलिटरी वर्ल्ड गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. नंतर त्याच्या एका सहकाऱ्याने खुलासा केला की त्याला इतर देशांतील खेळाडू राहणाऱ्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आले होते. चाओ शाओ म्हणतात की त्यांना संशय आहे की त्याच्या साथीदारांना तेथे व्हायरस पसरवण्यासाठी पाठवले गेले होते.

आरोग्य तपासणीसाठी शिबिरात पाठवले
एप्रिल 2020 मध्ये, चाओ शाओ यांना तुरुंगात उइगरांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी शिनजियांगला पाठवण्यात आले. व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना आरोग्य तपासणीचे काम देणे कितपत योग्य आहे? चाओ यांना वाटते की त्यांना  फक्त व्हायरस पसरत आहे की नाही हे पाहण्यासाठी पाठवले गेले होते, किंवा त्यातून विषाणू पसरवण्यात आला होता.

चाओ शाओ म्हणाले की चीनने काय केले आणि ते काय सांगत आहे हे एका मोठ्या कोड्याचा एक छोटासा भाग आहे. या महामारीने जगभरात 7 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी घेतला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे याचा तपास अजूनही सुरू आहे. शास्त्रज्ञ औषधे आणि लस शोधत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय शोधत आहोत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत