130 cars collided in a massive accident in america

भयंकर : अमेरिकेत भीषण अपघात, 130 गाड्या एकमेकांना धडकल्या

ग्लोबल

अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट वर्थमध्ये अतिशय भीषण अपघात झाला आहे. येथे महामार्गावर 130 वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या बर्फाळ टेक्सास आंतरराज्यीय महामार्गावर 130 हून अधिक वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातात सहा जण ठार तर अनेकजण जखमी झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्या थंडी असून अमेरिकेच्या काही भागात वादळासह पाऊस आणि बर्फ पडत आहे. अमेरिकेच्या काही भागात संपूर्ण रस्ता बर्फाच्या चादरीने झाकून गेला होता आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा अपघात इतका भयंकर होता की वाहने अक्षरशः एकमेकांवर चढली. अनेक गाड्या ट्रकखाली दबल्या गेल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले कि, टेक्सासच्या फोर्ट वर्थमध्ये झालेल्या अपघातानंतर दोन किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झालं.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर अनेक लोक बर्फाळ वादळात रात्रभर अडकले होते. सकाळी बचावकर्त्यांनी रहदारी सामान्य केली.

डाउनटाउन फोर्ट वर्थजवळ आंतरराज्यीय हायवे-35 वर झालेल्या या अपघातस्थळावर कार आणि ट्रक एकमेकांमध्ये घुसलेल्या दिसत होत्या. एक गाडी दुसर्‍या गाडीवर होती. वाहनांमध्ये अडकलेल्या बऱ्याच जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. रुग्णालयात किमान 65 लोकांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी 36 जणांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. अनेक लोकांवर घटनास्थळी उपचार करून त्यांना सोडून दिलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत