Mother elephant faints after baby falls into manhole, Rescue team performs CPR to revive her in viral video
ग्लोबल ट्रेडिंग

Video : पिल्लू मॅनहोलमध्ये पडल्यानंतर तणावामुळे हत्तीणी झाली बेशुद्ध, रेस्क्यू अधिकाऱ्यांनी तिला CPR दिला आणि…

थायलंड : थायलंडमध्ये एक विलक्षण घटना समोर आली आहे. एका आई हत्तीणीचे बाळ एका मॅनहोलमध्ये पडले होते मदतीसाठी मोठ्याने ओरडत होते. या सर्व तणावामुळे आई हत्तीणी बेशुद्ध झाली, त्यानंतर पशुवैद्यकीय आणि राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी तिला सीपीआर दिला. वास्तविक, तिचे बाळ एका मॅनहोलमध्ये पडले होते आणि कर्मचारी या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याची आई उन्मादात खाली कोसळली. या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सीबीएस न्यूजनुसार, थायलंडच्या नाखोन नायोक प्रांतात बुधवारी ही घटना घडली. एक हत्तीचे बाळ एका नाल्यात घसरले होते आणि मोठ्याने ओरडत होते. त्याच्या आईने तिची बाजू सोडली नाही, तेवढ्यात एका वाटसरूने हे सर्व बघितले आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली. नॅशनल पार्कच्या कर्मचार्‍यांना हत्तीणीला भूल द्यावी लागली कारण ती खूप तणावाखाली होती. मात्र, शॉट्समुळे ती खड्ड्यात अर्धवट अडकली.

रेस्क्यू टीमला क्रेनच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात यश आले, मात्र तणावामुळे ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे तिला बरे करण्यासाठी बचावकर्त्यांना सीपीआर द्यावा लागली. दरम्यान, तिच्या 1 वर्षाच्या बछड्याला मॅनहोलमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर आई हत्तीणी लवकरच शुद्धीत आली. त्यानंतर आई हत्तीणी आणि तिचे पिल्लू सुरक्षितपणे जंगलात परतले.

दरम्यान, व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी बचाव पथकाने केलेल्या जलद कारवाईचे कौतुक केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत