dies during corona vaccine

दिलासादायक बातमी : कोरोना लसीची चाचणी 90 टक्के यशस्वी; जाणून घ्या कधी येणार लस बाजारात..

कोरोना ग्लोबल

वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोनाच्या लसीची वाट बघत आहेत. आता कदाचित कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे या लसीकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षाही जास्त प्रभावी हे औषध ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. फायजरची लस पूर्णपणे यशस्वी ठरली तर या महिन्याच्या अखेरपर्यंत लसीला बाजारात विक्रीची अनुमती मिळण्याची शक्यता आहे. ही लस खरच यशस्वी ठरली तर संपूर्ण जगाला फार मोठा दिलासा मिळणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोनावर लवकरच लस येणार आहे. कारण ही लस चाचणीत 90 टक्के प्रभावी ठरली आहे.

बायोएनटेक कंपनीचे सह-संस्थापक उगुर साहिन यांनी आजचा दिवस खूप मोठा दिवस असल्याचं म्हटलं आहे. ही एक खूप चांगली बातमी आहे. विज्ञान आणि मानवतेसाठी आजचा दिवस महान आहे.

फायजर कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोरला यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ही लस कोरोनावर प्रभावी आहे, याचा आम्हाला पुरावा मिळाला आहे…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत