मियामी : मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी एका प्रवासी विमानाला आग लागली. विमान धावपट्टीजवळ येताच लँडिंग गियर कोसळले आणि त्यानंतर लागलेल्या आगीत किमान तीन जण जखमी झाले, असे वृत्तात म्हटले आहे. डोमिनिकन रिपब्लिकमधील लास अमेरिका आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मियामी, फ्लोरिडा येथे जाणाऱ्या रेड एअरच्या या फ्लाइटमध्ये १२६ लोक होते.
मियामी-डेड एव्हिएशन विभागाचे संप्रेषण संचालक ग्रेग चिन यांनी सांगितले की, क्रॅश लँडिंग आणि त्यानंतर लागलेल्या आगीत तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तर उर्वरित प्रवासी आणि क्रू यांना बसने टर्मिनलवर नेण्यात आले.
व्हिडिओमध्ये विमानाच्या पंखाजवळून आग आणि धूर निघताना दिसत आहे. मियामी-डेड फायर रेस्क्यूचे अग्निशामक आग विझवण्याचे काम करताना दिसले.
#RedAir MD80 just caught fire after landing at MIA airport
All passengers look to be safe as they exited the plane pic.twitter.com/go66ozwRSX
— zalmy cohen (@emalevin) June 21, 2022
MD-82 जेटलाइनर लँडिंग करताना धावपट्टीवर त्याच्या मार्गातील अनेक वस्तूंवर आदळले. विमानाच्या लँडिंग गियरमध्ये समस्या ते लँड करण्यापूर्वी आली की नंतर आली हे स्पष्ट झालेले नाही. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.




