shark bites off part of foot of man parasailing in jordan
ग्लोबल

VIDEO : पॅरासेलिंग करताना एका व्यक्तीवर शार्कने केला हल्ला, पायाचा काही भाग तुटला

जॉर्डन : पॅरासेलिंग करताना जॉर्डनच्या एका ३७ वर्षीय व्यक्तीवर अचानक एका शार्कने हल्ला केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही व्यक्ती पॅरासेलिंग करत असताना एक शार्क अचानक पाण्यातून बाहेर आला आणि त्याने या माणसाचा उजवा पाय चावून अक्षरशः तोडून घेतला. यात या व्यक्तीची अनेक हाडे मोडली असून अनेक स्नायू देखील फाटले आहेत. या हल्ल्यात त्या व्यक्तीच्या पायाचा काही भाग तुटला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या दुर्घटनेनंतर या व्यक्तीला तात्काळ प्रिन्स हॅशम मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्या उजव्या पायावर ऑपरेशन करण्यात आले. सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत