taiwan 7 year old boy thrown 27 times in judo class dies

ज्युडो प्रशिक्षकाने रागात चिमुकल्याला 27 वेळा जमिनीवर आपटलं, 2 महिने कोमात राहिल्यानंतर मृत्यू

क्राईम ग्लोबल

तैवान : ज्युडो प्रशिक्षकाने रागाच्या भरात 7 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा प्रशिक्षकाला मूर्ख म्हणाला होता, त्यामुळे या प्रशिक्षकाला राग अनावर झाला. त्यानंतर या प्रशिक्षकाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या चिमुकल्याबरोबर लढायला सांगितले. या दरम्यान, प्रशिक्षकाने या चिमुकल्या मुलाला 27 वेळा जमिनीवर आपटण्यास देखील सांगितले. यामुळे चिमुकल्याला उलट्या झाल्या आणि नंतर तो बेशुद्ध झाला. या प्रकरणानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे 2 महिने कोमात राहिल्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या विद्यार्थ्याचे नाव हुआंग असल्याचे सांगितले जात आहे. 21 एप्रिल रोजी त्याला सेंट्रल ताइचुंगमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हुआंगच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर तो सुमारे 70 दिवस कोमात होता. त्याच्या शरीराच्या बहुतेक भागांनीही काम करणे थांबवले होते. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी हुआंगचा लाइफ सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

वृत्तानुसार, हा ज्युडो प्रशिक्षक 60 वर्षांचा आहे. त्याला नुकताच न्यायालयातून जामीन मिळाला आहे. हा प्रशिक्षक दोषी आढळल्यास त्याला 7 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. हे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रशिक्षकाकडे परवाना नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, 21 एप्रिलला हुआंगचे काका त्याला प्रशिक्षकाकडे घेऊन गेले. ७ वर्षीय हुआंग पहिल्यांदाच ज्युडो शिकण्यासाठी आला होता, त्याला त्याबद्दल काहीच माहित नव्हते. या दरम्यान, निरागस हुआंग कोचला मूर्ख म्हणाला. त्यानंतर संतापलेल्या प्रशिक्षकाने हुआंगला त्याच्या इतर विद्यार्थ्यांशी लढायला सांगितले. त्याला ज्युडोविषयी कोणत्याही मूलभूत गोष्टी माहित नव्हत्या. त्यानंतर प्रशिक्षकाने त्याच्या इतर विद्यार्थ्यांना हुआंगला उचलून जमिनीवर आपटण्यास सांगितले. या दरम्यान, प्रशिक्षक हुआंगला पुन्हा पुन्हा उभे राहायला सांगत होता.

सुमारे 12-15 वेळा आपटल्यानंतर हुआंगने डोकेदुखीची तक्रार केली. परंतु, प्रशिक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या चिमुकल्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो बेशुद्ध पडला. यानंतरही कोचने त्याला सतत आपटण्यास सांगितले. हुआंगच्या कुटूंबाने दावा केला आहे की त्याला सुमारे 27 वेळा जमिनीवर आपटण्यात आले होते. तथापि, अहवालात असा कोणताही दावा करण्यात आला नाही. हुआंगचे काका ही संपूर्ण घटना घडत असताना तिथेच उपस्थित होते, परंतु ते प्रशिक्षकांना रोखू शकले नाहीत.

VIDEO : पॅरासेलिंग करताना एका व्यक्तीवर शार्कने केला हल्ला, पायाचा काही भाग तुटला

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत