क्राईम ग्लोबल

धक्कादायक! डॉक्टरचा महिला रुग्णावर बलात्कार, उपचाराच्या नावाखाली दिल्या झोपेच्या गोळ्या आणि…

Doctor raped women patient : आजकाल गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर येतात जी आश्चर्यचकित करतात. नुकतेच उघडकीस आलेले हे प्रकरण जाणून घेतल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या प्रकरणात उपचारासाठी आलेल्या तरुणीला झोपेच्या गोळ्या देऊन एका डॉक्टरने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. ही युवती झोप आणि नैराश्यावर उपचार घेण्यासाठी डॉक्टरकडे आली होती आणि उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने तिचे दीर्घकाळ लैंगिक शोषण सुरूच ठेवले. याप्रकरणी आता डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून डॉक्टरचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, यूकेमध्ये राहणाऱ्या आरोपी डॉक्टरची ओळख डॉ गोक्सेल सेलिकोल अशी झाली आहे. हा गुन्हा घडला त्यावेळी तो 55 वर्षांचा होता, त्याचे एका 22 वर्षीय महिलेशी संबंध होते, जी उदासीनतेशी झुंज देत होती. गोकसेल सध्या 78 वर्षांचा आहे, तर तरुणी 45 वर्षांची आहे. पोलिसांत तक्रार दाखल करताना तिने डॉ. गोकसेल यांच्यावर झोपेच्या गोळ्या देण्याच्या आणि नैराश्यावर उपचार करण्याच्या नावाखाली जबरदस्ती शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी झालेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, न्यायाधिकरण न्यायालयात सांगण्यात आले की, 1999 मध्ये तपासणीदरम्यान गोकसेलने पहिल्यांदाच महिला रुग्णाला अनुचित स्पर्श केला होता. तपासात असेही आढळून आले की, गोकसेलने स्त्रीला झोपेच्या औषधाचे आवश्यकतेपेक्षा जास्त डोस लिहून दिले होते. शेवटी, डॉक्टरांच्या उपचाराला कंटाळून, महिला रुग्णाने तिच्या आईसोबत राहण्यासाठी यूके सोडलं आणि स्कॉटलंडला राहायला गेली. येथे तिने दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेतले, तरीही पुढील सात वर्षे गोकसेल तिला औषधे लिहून देत राहिला आणि तो पोस्टाने औषधे पाठवत राहिला. इतकंच नाही तर झोपेच्या गोळ्या आणि नैराश्यावरील उपचारांच्या बदल्यात त्याने तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत