कोलंबियामधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथे लाईव्ह कार्यक्रमात स्टुडिओमधील एका पत्रकारावर एक मोठा टीव्ही सेट पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने त्या पत्रकाराला जास्त दुखापत झालेली नाही.
ही घटना टीव्ही चॅनल ईएसपीएन कोलंबियामध्ये काम करणारे पत्रकार कार्लोस ऑर्डुज यांच्याबरोबर घडली आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान स्टुडिओमध्ये 6 लोक उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी त्याठिकाणी बसलेल्या एका पत्रकारावर मोठा टीव्ही अचानक पडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. तथापि, कॅमेरामॅनने त्वरित प्रसंगावधान दाखवत कॅमेरा कार्यक्रमाच्या अँकरकडे वळविला. अँकर थोडा गोंधळला होता पण त्यानेही त्वरित ब्रेकची घोषणा केली.
कार्लोस ऑर्डोज यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली. ते पूर्णपणे स्वस्थ आहेत.
Shocking video. ESPN anchor crushed live on the air by falling set piece. Thankfully he was uninjured. pic.twitter.com/CeFxy8AksY
— Mike Sington (@MikeSington) March 10, 2021




