Corona vaccine taken by US President-elect Joe Biden
ग्लोबल

अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतली कोरोनाची लस

अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. जेव्हा कोरोनाची लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत, यासाठी आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली. “जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार असेल पाहिजेत यासाठीच मी हे प्रात्यक्षिक केलं आहे. याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही,” असं जो बायडन यांनी म्हटलं आहे. ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला.

जो बायडन यांनी ट्विट करत म्हटलं की, “आज मी कोरोनाची लस घेतली. दिवसरात्र मेहनत घेऊन हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे आभार. आम्ही तुमचं खूप काही देणं लागतो. मी अमेरिकेतील लोकांना विनंती करतो की कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर ती नक्की घ्यावी. याबद्दल चिंता करण्यासारखं काहीही नाही.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत