apple watch fall detection feature

Apple वॉचच्या एका Feature मुळे वाचला 78 वर्षीय व्यक्तीचा जीव

गॅझेट्स ग्लोबल तंत्रज्ञान

अमेरिका : स्मार्ट वॉच हे अनेकांना अनेक दृष्टीने महत्वाचे वाटते. ते तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे?, तुमच्या किती कॅलरी बर्न झाल्या? अशी सर्वच प्रकारची माहिती देते. यापुढेही जाऊन Apple Watch च्या फिचरमुळे एका 78 वर्षीय वृद्धाचा जीव वाचल्याची एक घटना समोर आली आहे. Apple स्मार्ट वॉचच्या Fall Detection Feature मुळे अमेरिकेतल्या 78 वर्षीय माईक येगर यांचा जीव वाचला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, माईक येगर यांची पत्नी काही कामासाठी बाहेर गेली होती. माईक येगर घरी एकटेच होते. त्यावेळी ते अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. याची त्वरित अॅपलच्या फॉल डिटेक्शनमध्ये नोंद झाली. अॅपलने त्यांना एक इमर्जन्सी मेसेज पाठवला, पण माईक यांच्याकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अॅपलने तात्काळ ऑटोमॅटिकली 911 या आपत्कालीन नंबरवर एक मेसेज केला आणि माईक यांच्या शारीरिक स्थितीविषयी माहिती दिली. या इमर्जंन्सी मेसेजमुळे Summerfield Local Department च्या अधिकाऱ्यांनी वेळेवर येऊन माईक येगर यांचा जीव वाचवला.

काही वेळाने माईक येगर यांना प्रश्न पडला की अधिकारी आपल्या घरी आलेच कसे? तेव्हा त्यांनी या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इथे वेळेवर कसे काय आलात? त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या अॅपल वॉचने त्यांच्या विभागाला एक आपत्कालीन मेसेज करुन याची माहिती दिली होती. अॅपल वॉचमध्ये एक इमर्जंन्सी सर्व्हिस नावाची सुविधा असते. जर आपल्याला काही आपत्कालीन शारीरिक स्थितीला सामोरं जावं लागलं तर त्याचा अंदाज घेऊन अॅपलची ही सर्व्हिस अॅटोमॅटिकली मेसेज करते. ऑटोमॅटिकली फॉल डिटेक्शन नावाची सेवा Apple Watch Series 4 मध्ये आणि त्याच्या पुढील मॉडेलमध्ये उपलब्ध असून याचा फायदा 65 वर्षांवरील लोकांना होतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत