immediate lockdown needs in india for a few weeks over break the coronavirus chain says dr anthony s fauci
ग्लोबल देश

लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढते – डॉ. अँथनी फाउची

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे की कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे त्यांनी दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फाउची म्हणाले कि, “मॉडर्नाच्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे आणि फायझरच्या दोन डोसमधील अंतर तीन आठवडे आहे. दोन डोसमधील अंतर वाढविले तर तुम्ही कोरोनाच्या विषाणूला बळी पडण्याची शक्यता वाढते. ब्रिटनमध्ये हेच घडले. त्यांनी दोन डोसमधील अंतर वाढविले, त्या काळात कोरोनाच्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आम्ही दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस करतो.”

दरम्यान, कोरोनाची लागण होऊन गेलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्याबद्दल देखील वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत, त्यावर बोलताना फाउची म्हणाले, की जरी कोरोनाची लागण होऊन गेली असली तरी लस घेणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना त्यांनी लशीचा पुरवठा अल्प असल्याने दोन डोसमधील अंतर वाढविले असावे, अशी टिप्पणीही केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत