नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी प्रक्रिया करू शकता.
१५ डिसेंबरपर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील. जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी किंवा ई-केवायई (eKYE) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे थांबू शकतात. ईकेवायसी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन ईकेवायसी कसे करावे?
- https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
- त्यानंतर फार्मर कॉर्नरवर जा.
- येथे ई-केवायसी (eKYC) च्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पान उघडेल.
- त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटीपी टाका.
- जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड (Invalid) लिहिलेले दिसेल.
ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया इनव्हॅलिड झाल्यास तुमचे पैसे अडकून पडू शकतात. जे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करू शकता. केंद्र सरकार यावर्षीचा पीएम किसानचा शेवटचा हप्ता देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.




