9 Al-Qaeda operatives arrested by NIA

NIA Raids : अल-कायदाच्या ९ जणांना अटक; घातपात घडविण्यापूर्वीच मोठी कारवाई

देश

NIA Raids : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे जप्त करण्यात आला. मॉड्यूल सक्रियपणे निधी गोळा करीत होता आणि काही दहशतवादी हे शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी नवी दिल्लीत येणार होते. दरम्यान, देशाच्या विविध भागात संभाव्य दहशतवादी हल्ल्यापूर्वी या सर्वांना अटक करण्याता आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्राथमिक चौकशीत या अटक करण्यात आलेल्या या व्यक्तींना पाकिस्तानस्थित अल-कायदाच्या अतिरेक्यांनी सोशल मीडियावर कट्टरपंथी बनवलं. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजधानीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्यास उद्युक्त केलं जात होतं. मात्र त्याआधीच या सर्वांना अटक करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत