NIA arrests former mumbai police officer pradeep sharma

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएनं आज पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक करण्यात आले आहे. आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमने धाड टाकली होती. […]

अधिक वाचा
devendra fadnavis press conference

सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की तो NIA ला काय सांगेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर :  सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की सचिन वाझें NIA ला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक का बरं चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय […]

अधिक वाचा
NIA team recreates Mansukh Hiren's murder scene

NIA च्या टीमने केले मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या घटनेचे नाट्यरूपांतरण

अँटिलीया प्रकरणात मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास आता एटीएस कडून NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम रात्री उशीरा रेतीबंदर खाडीत त्या ठिकाणी गेली जिथे 5 मार्चला मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. मनसुख यांची हत्या रात्री झाली होती, त्यामुळे NIA पथक सचिन वाझे यांच्यासमवेत रात्री तेथे पोहोचले आणि त्यांनी गुन्हा घडला त्या दिवशीच्या संपूर्ण घटनेचे […]

अधिक वाचा
I am being made a scapegoat, claimed Sachin Waze in court

मला बळीचा बकरा बनवलं जात आहे, कोर्टात सचिन वाझे यांनी केला दावा

मुंबई : सचिन वाझे यांच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती? याचे उत्तर वाझे देत नसल्याचं एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे. यावेळी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं एनआयएने कोर्टाला सांगितलं. तर या प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा सचिन वाझे यांनी केला आहे. सचिन वाझेंची आज कोठडी […]

अधिक वाचा
Sachin Vaze kept the threatening letter in a Scorpio car Outside Antilia

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं, चौकशीत वाझेंची कबुली

मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. ते धमकीचं पत्र आपणच ठेवल्याचं निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत कबुल केलं आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात […]

अधिक वाचा
It is time for every minister in the Mahavikas Aghadi government to introspect - Sanjay Raut

माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ‘ही’ धक्कादायक गोष्ट, मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ- संजय राऊत

मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]

अधिक वाचा
The mystery of Mansukh Hiren's death increased

मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA करणार

मुंबई : गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत होतं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ […]

अधिक वाचा
kangana ranauts reaction on sachin waze arrest

…तर महाराष्ट्र सरकार कोसळेल, सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणावरून शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे अटक प्रकरणाचा योग्य तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि शिवसेनेचं सरकार कोसळेल, असं तिने ट्विट करत म्हटलं आहे. कंगना रनौतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या प्रकरणात एक मोठं कारस्थान […]

अधिक वाचा
Sachin Waze arrested by NIA

सचिन वाझे यांना NIA कडून अटक

मुंबई : सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA कडून सचिन वाझे यांची शनिवारी कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सकाळी ११.३० वाजल्यापासून तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर त्यांना रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक करण्यात आली. NIA ने […]

अधिक वाचा
9 Al-Qaeda operatives arrested by NIA

NIA Raids : अल-कायदाच्या ९ जणांना अटक; घातपात घडविण्यापूर्वीच मोठी कारवाई

NIA Raids : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे […]

अधिक वाचा