Sachin Vaze kept the threatening letter in a Scorpio car Outside Antilia
महाराष्ट्र मुंबई

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं, चौकशीत वाझेंची कबुली

मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. ते धमकीचं पत्र आपणच ठेवल्याचं निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत कबुल केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात. एनआयएने बुधवारी विशेष एनआयए कोर्टाला या प्रकरणात यूएपीए कलम लावण्याविषयी माहिती देताना अर्ज दाखल केला. वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक शिंदे यांच्या घरी सापडलेल्या प्रिंटरच्या माध्यमातून हे इंग्रजी पत्र तयार केलं होतं. ज्याचा तपास फॉरेन्सिक टीममार्फत करण्यात येत आहे. आज एनआयए सचिन वाझे व्यतिरिक्त मनसुख हिरेन यांच्या हत्येतील आरोपी विनायक शिंदे आणि नरेश यांच्या कोठडीची मागणी करणार आहे. त्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत