Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका सांगण्यासारखं – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मीडियाच्या विरोधात दावा दाखल केला होता. शिल्पा शेट्टीने मीडियाविरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटले की शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या दाव्याचा अर्थ वेगळा निघतो. हे आमच्याबद्दल चांगलं बोलणार नसाल तर काही बोलूच नका, असं मीडियाला सांगण्यासारखं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्या पॉर्न फिल्म प्रकरणी कोठडीत असलेला राज कुंद्राशी संबंधात अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. या प्रकरणात शिल्पाच्या सहभागाविषयी देखील काही माध्यमांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिल्पा शेट्टीने मीडियाच्या विरोधात दावा दाखल केला होता. राज कुंद्रा प्रकरणातील चौकशीविषयी माझ्याविरोधात बदनामीकारक बातम्या दिल्या जात असून माझी प्रतिमा मलीन केली जात आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना त्याविषयीच्या वार्तांकनाला मनाई करावी आणि संबंधित माध्यमांना भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती शिल्पा शेट्टीने केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

‘प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून आहेत. त्याला आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? तो बदनामीचा प्रकार कसा म्हटला जाऊ शकतो? हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका, असं सांगण्यासारखं आहे. शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते. प्रसारमाध्यमांनी राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?,’ असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच तुमच्या घरातील खासगी आयुष्याविषयी काही वार्तांकन झालं आणि ते बदनामीकारक असेल तर समजू शकतो. मात्र, तुम्ही सार्वजनिकरीत्या, तुमच्या घराबाहेर काही कृत्य केलं असेल तर त्याचं वार्तांकन प्रसारमाध्यमे करू शकत नाहीत, असं म्हणता येणार नाही. तुमच्या विनंतीवरून वार्तांकनावर बंदी घातल्यास प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर त्यांचा मोठा परिणाम होईल,’ असंही न्यायालयानं नमूद केलं आणि सुनावणी तहकूब केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत