devendra fadnavis press conference

सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की तो NIA ला काय सांगेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर महाराष्ट्र राजकारण

नागपूर :  सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की सचिन वाझें NIA ला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक का बरं चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय कामे करून घेतली म्हणून आता शंका कुशंका काढत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले की, फोन टॅपिंग रिपोर्ट नवाब मलिकांनी फोडला. माझा सवाल हा आहे की पोलिसांची बदनामी कुणी केली? सिंडिकेट राज कुणी चालवले? दलाली कुणी खाल्ली? बदल्या कुणी केल्या, वाझेची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली की नाव केले? असा सवालही त्यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, पोलिसांचे सीसीटीव्ही कुणी गायब केले तरी बॅकअपमध्ये सर्व फुटेज सर्व्हरला आहेत. प्रायव्हेट फुटेज गयाब होऊ शकते, पण पोलिसांचे नाही, अशी व्यवस्था आहे. त्याचे फुटेज मिरर इमेजिंग आहे. 2 ठिकाणी साठवले आहे. डीव्हीआरची ही व्यवस्था मी गृहमंत्री असताना केली आहे. डिजिटल फुटप्रिंट एक माणूस नष्ट करू शकत नाही, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचे, त्यांना काय समजते? ते रोज काही ही बोलतात. आमचे राम कदम आहेत, ते त्यांना उत्तर देतील. मला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत