The bodies of mother and child were found at different places in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले ‘ते’ मृतदेह आई आणि मुलाचे, पण…

पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख मात्र अजूनही बेपत्ता आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहत होते. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवला आणि त्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. त्यानंतर ते पिकनिकसाठी निघाले देखील होते. पण त्यानंतर काय झाले याविषयी कोणालाही माहिती नाही. दरम्यान, काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा मृतदेह आढळून आला. त्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलीस या खुनाचा तपास करत असतानाच रात्री नवीन कात्रज बोगद्याजवळ एका मुलाचाही मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलीस तपासात समोर आले की काल सकाळी सासवडला ज्या महिलेचा मृतदेह आढळला, त्या आलिया यांचा हा मुलगा आहे.

दरम्यान, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर आढळून आली आहे. आबीद शेख हे एका कंपनीत ब्रान्च मॅनेजर आहेत. ते बेपत्ता असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत