Young man stabbed to death in Pune

पुण्यात भरदिवसा कोयत्याचे वार करून तरुणाची हत्या, शेजाऱ्यानेच केले हे भयंकर कृत्य

क्राईम पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड : एका व्यक्तीला त्याच्या शेजाऱ्याने कोयत्याचे वार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. व्हिडिओ फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी 4 तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजता क्षीरसागर हे आपल्या घराबाहेर मित्र आणि मित्राच्या मुलाबरोबर उभे होते. या दरम्यान आरोपी आकाश जाधव त्यांच्याकडे आला, त्यानंतर अचानक त्याने पिशवीत लपवून ठेवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. हल्ल्यानंतर क्षीरसागर यांनी तेथून पळ काढला, परंतु डोक्याला लागलेले असल्याने थोड्या अंतरावर गेल्यानंतर ते खाली कोसळले. रस्त्यावर पडल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर सपासप वार केले आणि नंतर त्यांच्या डोक्यात दगड घातला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. क्षीरसागर यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. शेजार्‍यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीच्या शोधात एक टीम पाठविण्यात आली होती. त्यानंतर आरोपी चिखली भागात लपून बसल्याचे पोलिस अधिकारी नरहरी नाणेकर यांना समजले. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, परंतु व्हिडिओ फुटेजवरून पोलिसांनी त्याला ओळखले. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याला पकडले. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

कानिफनाथ आणि आकाश दोघेही शेजारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी आकाशला काही लोकांनी मारहाण केली होती. आकाशला वाटत होते की कानिफनाथच्या सांगण्यावरूनच त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याचा राग मनात धरून त्याने हे भयंकर कृत्य केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत