चंद्रपूर : चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. गॅस गळती झाल्याचं लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना डॉक्टर विश्वास झाडेंच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.