Appointment of Bhai Jagtap as Mumbai Congress President

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री अखिल भारतीय कमिटीनं हे जाहीर केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरत होता. याआधी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी या काळात वाढली होती.

भाई जगताप मुंबईमधील काँग्रेस पक्षाचा एक अनुभवी चेहरा आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये चरणजीतसिंह सप्रा यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री नसीम खान यांना प्रचार समिती अध्यक्ष करण्यात आलं असून सुरेश शेट्टी यांना मेनिफेस्टो कमेटीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत