Corona vaccine manufacturers should be protected from legal troubles, says Adar Punawala
देश

कायदेशीर त्रासापासून कोरोना लस निर्मात्यांना संरक्षण मिळायला हवं, आदर पुनावाला यांची सरकारकडे विनंती

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी सरकारकडे एक विनंती केली आहे. कोरोना महामारीच्या काळात लस निर्मात्यांना कायदेशीर त्रासापासून संरक्षण मिळायला हवं, असं पूनावाला यांनी म्हटलं. ‘कार्नेगी इंडिया’च्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलताना पुनावाला यांनी ही मागणी केली. लस निर्माते भारत सरकारसमोर ही गोष्ट लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोव्हिड १९ व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवताना येणाऱ्या अडचणी मांडत ते म्हणाले कि, जेव्हा काही चुकीचे दावे केले जातात आणि माध्यमांद्वारे आणखीनंच गोंधळ उडतो तेव्हा ‘लशीमुळे हे घडलं’ अशी भीती लोकांच्या मनात तयार होते. या भीतीवर मात करण्यासाठी सरकारनं पुढे येऊन लोकांपर्यंत योग्य गोष्टी पोहोचवायला हव्यात. ‘सर्व प्रकारच्या कायदेशीर दाव्यांपासून बचावासाठी उत्पादकांना, विशेषत: लस उत्पादकांना सरकारी कवच मिळायला हवं’, असं म्हणतानाच अमेरिकेत सरकारनं प्रत्यक्षात अशा संरक्षणाची तरतूद केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात लस चाचणीत सहभागी झालेल्या चेन्नईमधील एका स्वयंसेवकानं लशीचा साईड इफेक्ट झाल्याचा दावा केला होता. लशीमुळे आपल्या मज्जासंस्था आणि स्मरण शक्तीला इजा पोहचल्याचं म्हणत या व्यक्तीनं कंपनीकडे पाच कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. त्यानंतर सीरमकडूनच या व्यक्तीवर चुकीचा दावा केल्याचा खटला दाखल करून १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत