Take care while having sex after taking corona vaccine, expert advice

कोरोना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

ग्लोबल लाइफ स्टाइल

नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार, रशियामधील लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करू नये, असा सल्ला यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. यामध्ये लैंगिक संबंध देखील समाविष्ट आहेत. यापूर्वी येथील लोकांना लस घेतल्यानंतर अल्कोहोल आणि सिगारेटपासून दूर राहण्यास सांगितले गेले होते. पत्रकार परिषदेत सेरॅटोव्ह क्षेत्राचे उप आरोग्यमंत्री डॉ. डेनिस ग्राफर म्हणाले कि, “प्रत्येकाला माहित आहे की सेक्स करण्यासाठी खूप ऊर्जा लागते. त्यामुळेच आम्ही लोकांना लस मिळाल्यानंतर लैंगिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत.

तथापि, डॉ. ग्राफर यांच्या वक्तव्यावर स्थानिक माध्यमांकडून टीका होत आहे. तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ओलेग कोस्टिन यांनी सांगितले की ते डॉ. ग्राफर यांच्या विधानाशी सहमत नाहीत. कोस्टिन म्हणाले की लस घेतल्यानंतर सेक्स पूर्णपणे थांबवण्याऐवजी योग्य ती काळजी घेऊन आपण सेक्स करू शकता.

दरम्यान, भारतात लसीकरणानंतर अशी कोणतीही अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. तथापि, युनिसेफकडून लस घेतल्यानंतर काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युनिसेफ कडून देखील सांगण्यात आले आहे की लसीकरणानंतर २-३ दिवस कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक शारीरिक हालचाली टाळल्या पाहिजेत, कारण यावेळी शरीर लसीच्या दुष्परिणामांपासून बरे होत असते. युनिसेफने लसीकरणानंतर काही दिवस अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञ म्हणतात की अल्कोहोल आणि सिगारेट लसीचे दुष्परिणाम आणखी वाढवू शकतात. या व्यतिरिक्त, अल्कोहोलचा प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे लस शरीरावर कमी प्रभावी ठरते.

लस घेण्यापूर्वी आणि नंतर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, ही लस घेतल्यानंतर तुम्ही भरपूर पाणी प्यावे. लस घेतल्यानंतर हातात वेदना, ताप, थंडी वाजणे यासारखी लक्षणे दिसतात जी दोन दिवसांत स्वतःच बरी होतात. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही आठवड्यांनंतरच शरीरात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणून या वेळी बेफिकीर राहू नका.

कोणतीही लस 100% प्रभावी नसते, त्यामुळे लस मिळाल्यानंतरही आपल्याला वारंवार आपले हात धुवावे लागतील, मास्क लावावा लागेल आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे लागेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत