Cyclone Taukte Heavy Rains With Strong Winds in maharashtra

हवामान विभागाकडून तळकोकणात रेड अलर्ट जारी, नदीची पाणी पातळी वाढल्यास मुंबई-गोवा महामार्ग बंद

महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राजापुर येथील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून तळकोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुना नदीची पाण्याची पातळी वाढली तर मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहतूकीसाठी बंद केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. राजापूर येथील मुंबई-गोवा महामार्गावर ब्रिटिशकालीन ब्रिजवर राजापूर तहसिलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष जमिर खलिपे, मुख्यधिकारी देवांनंद ढेकळे, स्थानिक नगरसेवक सुभाष बंड्या बाकाळकर, राजापूरचे तलाठी कोकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पुढचे ३ ते ४ दिवस हे कोकणासाठी धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्य असेल तरच घराबाहेर पडावं, असं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात पाणी साचले आहे. नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे. हवामान विभागाकडून तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत